मावळ :
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा आंतरविभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर येथे घेण्यात आलेल्या आंतर विभागीय पॉवरलिफ्टिंग महिला स्पर्धे मध्ये सिद्धांत अभियांत्रिकी महाविद्यालय (सुदुंबरे, मावळ, जिल्हा पुणे) ची विद्यार्थीनी कु. मृणाली मनोहर भोंग ( प्रथम वर्ष एमई) हिने ८४ किलो वजनी गटात एकूण ३२० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवला.
कु. मृणाली मनोहर भोंग हिचे पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षक श्री. विजय पाटील व महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. गोपिनाथ काळोखे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष आर. एस. यादव सर, उपाध्यक्ष सिद्धांत यादव सर, मिहीर यादव सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. व्ही. कांबळे सर, उपप्राचार्य यु. व्ही. शिंदे सर व रजिस्ट्रार हरिहर चौरे सर यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments