-->

Ads

Maratha Reservation: पांडेबुवांची ट्रंक उघडली, नोंदीचा खजिना सापडला अन् अख्ख्या गावाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला

Maratha Kunbi certificate: राज्य सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या अनेकजण आपल्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी शोधत आहेत.


छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायची कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड तालुक्यातील कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा गावातील एकाने अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडली. या ट्रंकेत जीर्ण झालेली कागदपत्रे आढळली. त्यावरील धूळ झटकली असता, त्यामध्ये निजाम कालीन उर्दू भाषेत व देवनागरी भाषेत महसुली नोंदीचा खजाना सापडला. यामुळे अख्या गावाच्या नोंदी आढळून आल्याने गावकऱ्यांचा भावी पिढ्यांचे कल्याण झाले असून त्यांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज लढतो आहे. न्यायालयीन लढाई लढल्यानंतर समाजाने रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आता आंदोलन सुरू आहे. मनोज जरंगे यांच्या पाठपुराव्यानंतर नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, शासनाने सुरू केलेल्या प्रमाणपत्र वाटप योजनेतून प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदी आणायच्या तरी कुठून? असा प्रश्न असंख्य मराठा समाजाच्या बांधवांसमोर आहे. असाच प्रश्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या धानोरा गावच्या गावकऱ्यांसमोर उपस्थित झाला. कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी नोंदी सोडण्यासाठी या गावकऱ्यांनी देखील शोधाशोध सुरू केली. यावेळी सोमीनाथ काकडे यांनी घरामध्ये अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडून बघितला असता, त्यामध्ये कागदपत्रांचा गठ्ठा आढळून आला. या कागदपत्रांवरील धूळ झटकून बघितली असता, यामध्ये निजामकालीन उर्दू भाषेत तसेच देवगिरी भाषेत भाषांतर केलेली काही महसूल नोंदीचा खजाना हाती लागला. यावेळी संपूर्ण कागदपत्र तपासले असता यामध्ये संपूर्ण गावाचा नोंदींचा खजिना समोर आला.

दरम्यान या प्रकरणी धानोरा गावचे ग्रामस्थ सोमीनाथ काकडे यांनी सांगितले की, आमचे आजोबा अंबादासजी पुंजाजी काकडे हे पूर्वी गावचे पांडेबुवा म्हणजे आताचे तलाठी म्हणून काम बघायचे. यामुळे गावातील सगळ्या नोंदी त्यांच्याकडे असायच्या. यामुळे आम्ही अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडून बघितला असता यामध्ये दस्तावेज आढळून आले आहेत. दिवंगत अंबादास काकडे यांनी जपून ठेवलेला दस्तावेज नोंदींचा खजिना हाती लागल्यामुळे अनेक कुटुंबाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला व त्यांच्या भविष्याचा कल्याण होणार आहे. हे दस्तावेज निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांना शिष्टमंडळासह सुपूर्द करण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments