Manpada Crime News : मानपाडा पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Thane Crime News, Manpada Police : घराच्या गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला महिनाभरानंतर वेगळं वळण लागलं आहे. महिलेने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी घराच्या गॅलरीतून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police) करण्यात आली होती. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे
महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेला एका व्यक्तीकडून धमकी दिली जात होती. तिचे फोटो व्हायरल करण्यात येतील, असे तिला सांगितले जात होते. तसेच तिच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. ती मानसिक तणावात होती. यातूनच तिने घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली.
या प्रकरणी कुटुंबीयांनी हरियाणा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. मानपाडा पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
डोंबिवली पूर्व देसले पाडा परिसरात विवाहित महिला राहत होती. गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाल्याची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
या महिलेच्या कुटुंबीयांनी हरियाणा येथील पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात तक्रार केली. जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. ब्लॅकमेलिंगला त्रासल्याने मानसिक तणावातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. हे प्रकरण मानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केले आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
0 Comments