-->

Ads

आदिवासी कृती समितीच्या वतीने भव्य निषेध

महिलांच्या नग्न धिंड काढल्याच्या घटनेचा व निष्क्रिय व नैतिकता हरविलेल्या राज्य व केंद्र शासनाचा निषेध


प्रतिनिधी धमा ढोले: पुसद/ मणिपूर राज्यातील महिलांची नग्न अवस्थेत काढलेली धिंड बलात्कार करून केलेली हत्येचे घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मध्य प्रदेशातील भाजपा आमदाराचा कार्यकर्ता प्रवेश शुक्ला याने आदिवासी युवकाच्या अंगावर लघवी केली या अमान्य कृत्य करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या इसमावर कठोर कारवाई करण्यात यावी. समान नागरी कायदा आदिवासींचा पारंपारिक रूढी परंपरा व संविधानिक हक्क अधिकाऱ्यांना मारक असल्यामुळे आदिवासींना हा कायदा लागू करण्यात येऊ नये. या मागणीसह मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर महामानवाबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करून त्याच्यावर लगाम लावावा अशा मागणीचे निवेदन महिलांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती मोर्चा आयोजक कृती समितीने दिली आहे. आयोजित मोर्चामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन मोर्चाचे आयोजक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.  



मणिपूर गेल्या तीन महिन्यांपासून जळत आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. माणसे मारली जात आहेत.  माजी सैनिकाच्या पत्नीसह इतर  महिलांना पूर्णता नग्न करून धिंड काढल्या गेली. एक नव्हे  शेकडोंच्या संख्येतील नराधमांनी छेडखानी, बलात्कार, खून, असे प्रकार करून समाजात दहशत माजवली आहे. आणि भाजपच्या मनिपुर राज्य व केंद्र सरकारने अश्या नराधमांची पाठीराखन केली आहे. पिडीत महिला आदिवासी समाजाच्या आहे,  परंतु देशामध्ये मुली महिलांना आदराने सन्मानाने वागण्याची संस्कृती प्रथा परंपरा आहे. त्यामुळे आदिवासीच नव्हे तर देशातील कोणत्याही जातीतील महिलांवर अश्या प्रकारचे अन्याय होता कामा नयेत, अशीच समानतेची, आदराची आणि सन्मानाची शिकवण भारतीय राज्यघटनेने दिली आहे. 



         असे असताना सार्वजनिक ठिकाणी महिलांची नग्न धिंड काढल्या जाते आणि सोशल मीडियावर मणिपूरमधील या हादरवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशवासियांची मान शरमेने खाली झुकली आहे. सर्वकाही पोलिसांसमोरच घडले आहे, परंतू गुन्हा ४९ दिवसांनी तर पहिली अटक ७८ दिवसांनी झाली आहे. अशी घटना घडल्यानंतर मणिपूर च्या राज्य व केंद्र शासनातील भाजप सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नाही. महिलेच्या नग्न धिंड च्या घटनेनंतर संपूर्ण देशात दहशत माजली आहे. अशा आरोपींना वेळीच फाशीची शिक्षा झाली नाही तर असे गावगुंड यांना बळ मिळेल आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होईल त्यामुळे अशा मानसिकता असणाऱ्यांना जागीच ठेचण्याची गरज आहे. तेव्हा यातील दोषींवर फाशीच्या शिक्षे सोबतच महिला मुलींसोबतच देशवासीयांमध्ये पसरलेली दहशत कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी अशी मागणी करत मणिपूर केंद्र व राज्य सरकारच्या निषेध नोंदविण्यासाठी पुसद येथे भव्य आक्रोश मोर्चा 9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिनी आयोजित केली असल्याची माहिती आदिवासी कृती समिती पुसदचे अध्यक्ष माधवराव वैद्य यांनी येथील रामकृष्ण हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

       तसेच सर्व सामाजिक संघटनांनी व महिलांचा आदर सन्मान करणाऱ्या भारतीय नागरिकांनी या निषेध मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन सुद्धा मोर्च्याच्या आयोजकांनी केले आहे. त्याबरोबरच नेहमीच वादग्रस्त असलेल्या व आपल्या वादग्रस्त विधानातून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणे, अप शब्दाचा वापर करून सामाजिक भावना दुखावणे, देश विरोधी वक्तव्यातून वाद निर्माण करणारे तुकाराम भिडे यांना लगाम न लावल्यामुळे त्यांनी आज महामानवांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे त्यामुळे महामानवानबद्दल अपशब्द बोलणाऱ्या या मनोहर उर्फ संभाजी भिडे चा निषेध सुद्धा या मोर्चातून नोंदविल्या जाणार असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे. सदर 9तारखेला 


 सदर भव्य आक्रोश मोर्चा पुसद येथील बिरसा मुंडा चौक येथून सुरुवात होणार असून बस स्टॅन्ड चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महात्मा गांधी चौक या मार्गाने मार्गस्थ होत तहसील कार्यालय परिसरातील यशवंत रंग मंदिरावर या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. या भव्य आक्रोश मोर्चामध्ये तमाम आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे.
                        

Post a Comment

0 Comments