प्रतिनिधी :रेखा भेगडे :शिरूर लोकसभा मतदार संघातील सावरदरी गावामध्ये शिरूर लोकसभेच्या पक्षबांधणी संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे शिरूर लोकसभा लढविणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
सध्या महाराष्ट्रात इतर कोणत्याच पक्षाला विशेष स्थान राहिले नाही. कधी पहाटे शपथविधी होतो तर कधी अचानक नेहमी टीका करणाऱ्या पक्षात सहभागी होतो. अशी टीका यावेळी मनसेचे राज्याचे नेते राजेंद्र वागसकर यांनी केली.
सध्या राज्यामध्ये पक्षातील बदल पाहता सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यास कोणालाही रस राहिलेला दिसत नाही. जो तो आपला पक्ष वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे यावेळी समाजासाठी मनसे पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे यावेळी मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिरूर लोकसभा लढविण्यास मनसे आता पूर्णपणे तयार झाली आहे. आता जनतेच्या मनातून इतर पक्षाची प्रतिमा खूप कमी झालेली. कधी पहाटे, कधी दुपारी आणि कधी रात्री बदल करणारे पक्ष काय राज्याचे नव्हे तर देशाचे भवितव्य घडविणार अशी टीका यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार यांनी केली.
यावेळी जमलेल्या मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले. सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि शिरूर लोकसभा लोकसभा मतदार संघात मनसे पक्षबांधणी संदर्भात विशेष सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मनसेचे सरचिटणीस पक्ष निरीक्षक अजय शिंदे, मनसेचे राज्यउपाध्यक्ष संजय जामदार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अरविंद गावडे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, विद्यानंद मानकर, पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे, वाहतूक सेना अध्यक्ष बसपा वळसंगे, संघटक अभय वाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी आणि मनसेचे सदस्य विशाल डोके, अविनाश लोखंडे, अजय तापकीर, मनोज पडवळ, विवेक येवले, महेश खलाटे, गणपतराव साकोरे, आप्पा शेटे, सुनिल पवार, ओमकार पाचपुते, साहिल बुचूडे, सनी दौंडकर, संतोष बो-हाडे, सागर घुले, मंगेश काळे, निलेश घुंडरे, गणेश रौंधळ, सतिश पवार, रोहीत जाधव, नितीन पवार, संदिप गुप्ता, दिपक वाघ, परमेश्वर खेडेकर, हर्ष मिश्रा, दत्ता मरकज, शुभम स्वामी, नवनाथ देवकर, अनिल देशपांडे, अशोक शेटे, सुशांत दिवटे, खेड, जुन्नर, आंबेगाव, तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments