-->

Ads

पुसद येथील दोन्ही आमदार यकाच दावणीला व मंत्री पदाची बाजी कोण मारणा र या कडे जनतेची नजरा

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर पुसद : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभीफूट पडली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले आहे . ते आता शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे . त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या दोन गटांमुळे आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यावरुन खेचाखेची सुरू आहे . तर काहींनी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे तर एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांच्या संभ्रम निर्माण झाला असून कोणाचा झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . आणि त्यातच पुसद मतदार संघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी अजित पवार यांच्या गटात सामील झाल्याने शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याचे आज मंथन शिबिर आयोजित करण्यात आल्याने या मंथन शिबिरात माजी मंत्री मनोहर नाईक यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली असल्याची माहिती उपलब्ध आहे परंतु विशेष म्हणजे नाईक घराण्याचे वारसदार आमदार इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती भाऊ नाईक हे मात्र या मंथन शिबिरात उपस्थित न राहिल्याने ते शरदचंद्र पवार गटात जाणार असल्याची चर्चा मात्र जोरात सुरू झाली आहे . त्यामुळे राज्यासह पुसद मतदारसंघातील वातावरण तापले आहे 



बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज व जेष्ठ नेते देखील उपस्थित होते यावेळी लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पुसदचा विकास करण्याच्या दृष्टीने अजित पवार सोबत जात असल्याचे जाहीर केले.त्यावर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आमदार नाईक यांनी संवाद साधला असता सर्वच कार्यकर्त्यांनी आमदार इंद्रनील नाईक यांना पाठिंबा दिला परंतु विशेष बाब म्हणजे आमदार इंद्रनील नाईक यांनी जनतेला विश्वासात न घेता आधीच अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांचा विश्वासघात करून फुटीर गटाला साथ दिली होती व ते अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला ही हजर होते मग मतदार संघातील जनतेला त्या गटात जाण्याआधी विश्वासात का . ? घेतले नाही असा सर्वसामान्य मतदाराला प्रश्न पडला आहे . आधीच बंडखोरासोबत गेले व नंतर शिबिर घेतले याचा अर्थ जनता या गोष्टीमुळीच गांभीरणी घेत नाही किंवा जनतेला या गोष्टी मुळीच मान्य नाही जे जातात ते संधी साधू वैयक्तिक स्वार्थासाठी हेतू साध्य करण्यासाठी जाणारे असतात असा पक्का समज सर्वसामान्य जनतेचा झाला आहे . त्यामुळे असे नेते कुठेही गेले तरीही सर्वसामान्य जनतेला काहीच फरक पडत नाही पक्ष कुठलाही असो प्रत्येक गावात त्या त्या पक्षाचे दोन - चार नेते असे संदीप साधी असतात त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचेही भलं होत नाही त्यामुळे अशी मंडळी सत्ते शिवाय जगू शकत नाही.मतदारांनो डोळे मिटून नव्हे , जागरूक राहा येणारा काळ वाईट आहे . काही कार्यकर्त्यांनी जरी पाठिंबा दर्शविला तरी आमदार इंद्रनील नाईक यांचे जेष्ठ बंधू व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक हे मात्र यानंतर शिबिरात गैरहजर असल्याने ते शरदचंद्र पवार गटात जाणार असल्याची चर्चा मात्र पुसद शहरात जोरात सुरू आहे त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हे चित्र जनतेला पाहायला मिळाले तर यात नवल वाटू नये .





Post a Comment

0 Comments