-->

Ads

99 जणांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, 12 हजार रुपये दर; बारावीचा पेपर सरांनीच फोडला

 

या ग्रुपमध्ये एकूण 99 जणांचा समावेश होता. पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले
बुलढाणा, 05 मार्च : राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे. मात्र, बुलडाण्यात परिक्षेआधीच गणिताचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला होता. अखेर या प्रकरणी 2 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पेपर वाटण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवला होता.

सध्या राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत.. यंदाच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी मुक्त अभियान राबवण्याकडे शिक्षण विभागाने भर दिला आहे. मात्र बुलढाण्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. सातत्याने बारावीच्या पेपरात गंभीर चुका होत असल्याचं समोर येत असताना बुलढाण्यात गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला..आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या पेपर फुटी प्रकरणामध्ये दोन शिक्षकांना अटक केली आहे. या शिक्षकांनी व्हॉट्सअप ग्रुप बनवून पेपर व्हायरल केला असल्याचे समोर आले आहे. या ग्रुपमध्ये एकूण 99 जणांचा समावेश होता. पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. परीक्षेत गैर प्रकार करण्यासाठी कट रचला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.


दोन दिवसांपूर्वी बारावीच्या गणिताचा पेपर सुरू होणार होता, मात्र त्याआधीच सिंदखेड राजा तालुक्यात साडेदहा वाजता सोशल मीडियावर गणिताचा पेपर येऊन धडकला. गणिताचा पेपर सुटला असल्याची बोंब पेपर सुरू होण्याची उठली. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले.

बारावीच्या परीक्षेत शिक्षण विभागाच्या सातत्याने चुका समोर येत आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभाग उच्च माध्यमिक शिक्षण विभाग बारावीच्या या परीक्षा घेताना किती जबाबदारीने वागतेय, ते सिद्ध होत आहे. आधी इंग्रजीच्या पेपरात प्रश्नपत्रिकेत उत्तर छापून आलं. त्यानंतर बुलढाण्यात पेपर सुरू होण्याआधीच पेपर फुटला. अशा सातत्याने होणाऱ्या चुकांना नेमकं जबाबदार कोण आहे ? हाही प्रश्न आता सर्वसामान्य विचारू लागले आहे.

Post a Comment

0 Comments