-->

Ads

या वाढत्या बेकारीच्या काळात कोणत्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या अंगी विषेश कौशल्य असणे गरजेचे..... डॉ.मो.नजमोद्दीन

  येथील स्व.सुधाकरराव नाईक महाविद्यालय पत्रकार दिनाचे औचित्य साधुन झालेल्या "विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास मार्गदशन व्याख्यान" कार्यक्रमा मध्ये, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अकरावी आणि बारावीचे वर्ष हे त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असते, हे दोन वर्षे निघून गेली की, ती परत येत नाहीत.

 म्हणून विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या संधीचे सोने करावे, विद्यार्थ्यांचे शिक्षणावरच लक्ष केंद्रित असावे. प्रमुख वक्ते मोहम्मद नजमोदींन यांनी या अभूतपूर्व


 कार्यक्रमात तिन्ही विभागातील विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिले. विशेषतः येत्या पाच  वर्षांत आजचे ६५ व्यवसाय नष्ट होतील, जग हे झपाट्याने बदलत चालले आहे.त्यामुळे बेकारी वाढत चालली आहे. त्या साठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी विषेश कौशल्य असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मो.नजमोद्दीन सर यांनी केले. तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष  उमरखेड चे उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी विचार व्यक्त करतांना,परिस्थिती प्रगतीला बाधक ठरू शकत नाही,जिद्द कायम ठेवा ,ध्येय गाठण्यासाठी अथक  परिश्रम करा,जिद्द परिस्थितीला बदलू शकते व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर




 भीती,लाज दूर ठेवा, हे पटवुन दिले. या वेळी मंचकावर संजय खंडारे ठाणेदार महागाव, मो नजमोद्दीन शमशोद्दीन प्रमुख वक्ते,प्रा.विनोद राठोड,प्रा.सुधीर भाटे, प्रा.अब्दुल समद हे होततर ११ वी१२वी च्या विध्यार्थी विद्यार्थिनी सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. डॉ.गजानन वैद्य,विवेक पांढरे, शेख अनिस,,शैलेश वानखेडे,शेख तसलिम,विवेक शेळके, विजय पाटील,संजय जाधव, चंद्रशेखर पंडागळे,शेख रिजवान, सचिन  छन्नीकर,  हे पत्रकार उपस्थित होते फुलसावंगी पत्रकार संघातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments