-->

Ads

प्लास्टिक बॅगविरोधी पथकातील कर्मचाऱ्याला दुकानदाराकडून जबर मारहाण, पिंपरी चिंचवडीमधील धक्कादायक VIDEO

 


 पिंपरी चिंचवडमध्ये प्लास्टिक बॅग विरोधी कारवाईसाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्याला एका दुकानदाराकडून जबर मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितदुकानदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौकातील मिठाईच्या दुकानात घडली. प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी दुकानांत शिरले. यावेळी दुकान मालक हिम्मतलाल भाटी यांनी त्यांना कारवाई करण्यास विरोध केला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि दुकान मालकाने अंगावर येऊन त्याने कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्वतःची ओळख सांगण्यासाठी आय कार्ड दाखविण्याची विनंती दुकानात आलेल्या पथकाला दुकान मालक हिम्मतलाल भाटी यांनी केली. मात्र, यावेळी संतापलेल्या महापालिकेच्या निलेश गणपत कांबळे या कर्मचाऱ्याने थेट हिम्मतलाल भाटी यांच्या गल्ल्याकडे बळजबरीने शिरून गल्ल्यात हात टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लक्ष्मी स्वीट शॉपचे मालक हिम्मतलाल भाटी यांनी केला आहे.

प्लास्टिक बंदी विरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांना मारहाण करून कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल लक्ष्मी स्वीट दुकानाचे मालक हिम्मतलाल बाटी यांनी केला आहे. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या दुकानावर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेनुसार कारवाई करायला हवी होती.मात्र, त्यांनी तसे केले नाही आणि दादागिरी करत आमच्या दुकानावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून महापालिकेच्या अशा दादागिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणी हिम्मतलाल भाटी आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाने केली आहे.


Post a Comment

0 Comments