जल -जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची त्रस्त समितीकडून चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे . दिनांक ०४/०२/२०२२ रोजी ग्रामसभेमध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये समावेश असलेल्या कुटुंबांनी अर्ज सादर करूनही त्यांना ग्रामसेवक खंदारे यांनी पंतप्रधान आवास घरकुल पात्रता यादीमध्ये पैसे दिले नसल्यामुळे त्यांचा समावेश केला नाही . तेव्हा त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या वर सुद्धा समिती नेमून चौकशी करून लाच लुचपत विभागाकडून चौकशी करण्यात यावी व पंतप्रधान आवास योजनेमध्ये पात्र कुटुंबीयांना हेतू पुरसर वगळण्यात आले याबाबत संबंधित कर्मचारी ग्रामसेवकसरपंच यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी . विस्ताराधिकारी डाखोरे यांनी १४ व १५ व्या वित्त आयोगामध्ये केलेल्या कामाची चौकशी बोगस असून ती तात्काळ रद्द करून त्रस्त समितीकडून चौकशी करण्यात यावी . ग्रामसेवक खंदारे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन माणिक डोह येथील शेकडो महिला व पुरुष यांनी दिनांक २२ ऑगस्ट पासून पंचायत समिती पुसदच्या समोर बेमुदत उपोषणास सुरुवात केलेली आहे .
आज दिनांक २३ रोजी आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ महासचिव व माजी जि . प . अध्यक्षा तथा अनुसूचित जमाती सेल भा . ज . पा . प्रदेश उपाध्यक्षा मा . डॉ . सौ . आरतीताई फुपाटे यांनी उपोषणकर्त्यांच्या मंडपात भेट देऊन गटविकास अधिकारी गजानन पिल्लेवाड हे खेड्यावर गेलेले असल्या कारणाने सौ . आरती ताई यांच्या सह सर्वांनाच दोन - अडीच तास गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडावा लागला . गटविकास अधिकारी यांना बोलावून संबंधित उपोषण कर्त्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडून संबंधित ग्रामसेवक यांना बोलावून उपोषण कर्त्यांच्या उपोषणातील मुद्द्यावर असलेल्या मागण्यांची चौकशी करून उपोषणकर्त्यांस उपोषणापासून थांबविण्यासाठी तात्काळ समिती नेमून चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले . त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांनी तात्काळ समिती नेमून अवघ्या २ दिवसांमध्ये सर्व प्रकरणाचे चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले . यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अॅड . सचिन नाईक , माजी सभापती ज्ञानेश्वर तडसे , ग्राहक संरक्षण संस्थेचे विदर्भ महासचिव सुरेश भाऊ शिडाम , सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेटकर , नारायणराव काळे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते . या निवेदनावर उपोषणासइंदुबाई पांडुरंग माहुरे , अनिता दिलीप आसोले
, लक्ष्मीबाई साहेबराव टाळीकुठे , लताबाई मारुती ढोले , सुशीला देवराव कांबळे , वनिता यशवंत ढोले , सागर नाथा डोले , शांताबाई धोंडबा ढोले , पूर्णाबाई भगवान ढोले , शोभा किसन बिरगणे , संतोष गणू ढोले , गोदावरी ज्ञानू ढोले , दीपक महादू ढोले , मिथुन बापूसाहेब ढोले , विशाल राठोड , पवन विजय तडसे , संतोष तुळशीराम देवतळे , सुरेश किसन बिरगणे , मारुती किसन बिरगणे , शकुंतला श्रावण टाळीकुठे , विमल प्रकाश ढोले , प्रदीप किसन बिरगणे , लक्ष्मी प्रदीप बिरगणे , विक्रम राजाराम मराठे , जिजाबाई दिगंबर कुलसंगे , संतोष राजाराम राठोड , सदाशिव गणपत माहुरे , यमुनाबाई विजय राठोड , विनोद , धनराज , नारायण , लक्ष्मण , सटवाजी रंगराव बुरकुले व पंडित सुभाष ढाकरे इत्यादी गावकऱ्यांच्या महिला व पुरुषांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत . मा . आरतीताई फुपाटे यांनी गट विकास अधिकारी यांना ह्या सर्व समस्या जाणून घेऊन विशेष करून आदिवासी गावांमध्येच ह्या समस्या जास्तीत जास्त उद्भवत असल्यामुळे गटविकास अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात मागील ३-४ वर्षांपासून पुसद पंचायत समितीला स्थायिक गट विकास अधिकारी नसल्याने या ठिकाणी प्रभारी गटविकास अधिकाऱ्यावरच एवढ्या मोठ्या पंचायत समितीचा कारभार चालत असल्या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली व या लोकांच्या समस्या न सोडविल्यास जन आंदोलन उभे करण्यात येईल असे सुद्धा सांगितले



.jpeg)

0 Comments