-->

Ads

अंबरनाथ मधील तायक्वांदो खेळाडू नॅशनलसाठी पात्र

    अंबरनाथ पश्चिमेकडील बालाजीनगर परिसरामधील प्रसिद्ध , मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या नगरपरिषदेच्या कै. साबीरभाई शेख समाजमंदिर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून तायक्वांदो प्रशिक्षक राजेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजूबाजूच्या प्रभागातील तब्बल ५० विद्यार्थी तायक्वांदो (Taekwondo- martial art) साठी सराव घेत होते. त्यातील ८ विद्यार्थी हे नॅशनल साठी पात्र झाले आहेत. पश्चिमेकडील परिसरामधील हे सर्व विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना सरावासाठी ही जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या कौशल्यावर पात्र झाले, त्यानिमित्त त्यांचे कौतुक करून त्यांना प्रशस्तीपत्र व बेल्ट प्रदान केले. 

             नुकत्याच झालेल्या पॅराऑलिपिक्स स्पर्धेमधील भारतीयांचा विजय वाखडण्याजोगा होता, त्यानंतर ह्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन स्फूर्ती व आवड तयार झाला असून कसून मेहनत घेण्यास हे खेळाडू तयार आहे. त्यासाठी सर्वोतोपरी मदत त्यांना शिवसेना व स्थानिक मा. नगरसेवक राजेंद्र वाळेकर, मनीषा वाळेकर करतील अशी ग्वाही दिली. प्रसं
गी निखिल वाळेकर यांनी उपस्थिती लावून खेळाडूंचे मनोबल वाढवले.

Post a Comment

0 Comments