-->

Ads

अमृत महोत्सव दिनी उमेदच्या झुणका भाकर केन्द्राचे उद्घाटन

ऊमरखेड    पंचायत समिती कार्यालयात ग्रामिण भागातून येणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामिण महिला जिवनोन्नती अभियान (उमेद ) अंतर्गत स्वातंञ्याच्या अमृत महोत्सव दिनी 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती परिसरात झुनका भाकर केन्द्राचे उद्घाटन करण्यात आले 


प्रतिनिधी    : - संजय जाधव

          ग्रामिण भागाच्या सर्वांगिण विकासाचे केन्द्र बिंदू असलेल्या पंचायत समिती परिसरात विविध विकास कामांच्या अनुषंगाने तसेच कार्यालयीन कामांसाठी लालुक्याच्या शेवटच्या टोकापासून ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात येणारे पदाधिकारी , विविध योजनांचे लाभार्थी यांना स्वस्त दरात भोजन उपलब्ध व्हावे या हेतूने महाराष्ट्र ग्रामिण महिला जिवनोन्नती अभियान ( उमेद ) अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून झुनका भाकर केन्द्राचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखेडे यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले . यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमोल चव्हाण, मधुकर मुंडे , कनिष्ठ अभियंता सहाय्यक अनिल लाखकर तसेच उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रामदास इटकरे , तालुका व्यवस्थापक अनिल वाढवे तालुका व्यवस्थापक मिना मस्के, प्रभाग समन्वयक माधुरी दळवी  यांची प्रमुख उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments