-->

Ads

कांदिवली पूर्वेला जादूटोण्याचा प्रकार उघडकीस , एक संधीग्ध व्यक्ती झाला सीसीटीव्ही कॅमेरेत कैद


कांदिवली पूर्वेकडील अपना नगर परिसरात एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे, यासाठी येथील काही घरे तोडण्यात आली असून अजूनही काही घरे तोडायची आहेत. याठिकाणी काळ्याजादूसाठी वापरण्यात येणारे काही साहित्य आढळून आले आणि कोणीतरी जादूटोण्याच्या प्रयत्न करत असल्याचे काही दिवसांपूर्वी लोकांच्या निदर्शनास आले म्हणून येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. काल या कॅमेऱ्यात एक संदिग्ध व्यक्ती हातात राख घेऊन लोकांच्या घरावर फेकत असल्याचे चित्र कैद झाले, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments