पुसद : येथील नागपूर रस्त्यावर ईटावा वार्डातील सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळील डीपी वरील रोहित्राच्या सततच्या बिघाडामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत वारंवार विद्युत विभागाकडे तक्रार करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे . सुधाकरराव नाईक फार्मसी कॉलेज जवळील डीपीवर विद्युत विभागाने जुनेच विद्युत रोहित्र बसविलेले आहे . मागील कित्येक दिवसापासून शहरात फू . ना . ते बा . ना . रस्त्याचे काम सुरू आहे . या रस्त्यावर मधोमध येणारे विद्युत पोल हटवून रोडच्या बाजूला नवीन पोलची उभारणी केल्या जात आहे .
ही उभारणी केल्या जात असताना नवीन रोहित्र बसविणे बंधनकारक असताना सुद्धा विद्युत विभागाचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत व त्या ठिकाणी थातूरमातूर पद्धतीने जुनेच रोहित्र बसविल्यामुळे नागरिकांना विद्युत भारनियमाचा त्रास सहन करावा लागतो आहे . या डीपीवर या विभागातील भरणीयमांचा जास्त लोड आहे त्यामुळे नवीन रोहित्र जास्त क्षमतेचे बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे . विद्युत वितरण कंपनीने नवीन रोहित्र न बसविल्यास या परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अनिल श्रीरंग चव्हाण पाटील यांनी दिला आहे .

0 Comments