-->

Ads

आधार कार्ड मागितलं मिळाली कानशीलात, महिला कर्मचाऱ्यासोबत अमानुष वागणुकीचा VIDEO व्हायरल


महिला कर्मचाऱ्यासोबत अतिशय वाईट आणि अमानुष पद्धतीनं वागणूक केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिला कर्मचाऱ्याने आधार कार्ड मागितलं. त्याचा राग आला म्हणून एका व्यक्तीनं महिला कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्यक्तीने कर्मचारी महिलेवर हात उचलला आणि तिच्या कानशिलात लगावली. त्यानंतर महिलेनंही चप्पल उचलून व्यक्तीला मारहाण केली. तिथून व्यक्तीने पळ काढला आणि काही वेळानं आपल्या साथीदारांसोबत आला. त्यांनी मिळून टोलनाक्यात तोडफोड केली. महिला कर्मचारी आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगढ परिसरात टोलनाक्यावर घडली. दुपारी 3.45 मिनिटांनी बूथ नंबर 5 वर ही महिला कर्मचारी बसली होती. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. आरोपी राजकुमार गुर्जरला महिला कर्मचाऱ्याने रोखलं. मी लोकल परिसरातील आहे असं त्याने सांगितलं. त्यावर महिलेनं राजकुमारला आधारकार्ड मागितलं. मात्र त्याने देण्यास नकार दिला. तिथे दोघांची बाचाबाची झाली. राजकुमारने महिलेच्या कानशिलात लगावली.

एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने महिलेची ओढणी ओढली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. आधारकार्ड दाखवण्यासाठी विचारले असता शिवीगाळ केल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे. 10 ते 15 मिनिटांनी तो त्याच्या साथीदारांसोबत आला आणि त्याने टोल नाक्याची तोडफोड केल्याचा आरोप देखील महिला कर्मचाऱ्याने केला आहे.

Post a Comment

0 Comments