-->

Ads

जळत्या चितेतल्या मृतदेहाचं शीर कापलं, नंतर..., मांत्रिकाचा भयानक अघोरी प्रकार


देशाला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास 75 वर्ष झाले. तरीही काही ठिकाणी अंधश्रद्धांवर सर्रासपणे विश्वास ठेवला जातो. सरकार, पोलीस आणि प्रशासनाकडून अंधश्रद्धेवर आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. पण तरीही काही विचित्र अघोरी प्रकार समोर येत असतात. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथील एक विचित्र अघोरी प्रकाराची घटना प्रचंड चर्चेत आहे. आरोपीने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन स्मशानभूमीत निखाऱ्यांमध्ये जळणाऱ्या चितेला बाहेर काढत मृतदेहाचं शीर धडापासून वेगळं केलं. त्यानंतर ते शीर घरी नेलं. मांत्रिक काहीतरी अघोरी प्रयोग करणार होता. पण गावकऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गावात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे पोलिसांना योग्यवेळी घटनेची माहिती मिळाल्याने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आणि घटना संवेदनशीलपणे हाताळण्यात आली.

संबंधित घटना ही शाहजहांपुर येथील पिपरौली गावात घडली आहे. मृतदेहाचं शीर कापून पळवून घेवून जाणाऱ्या आरोपींचं नाव गोपी असं आहे. पिपरौली गावातील एका वृद्धाचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं. त्यांच्या पार्थिवावर गावाबाहेरील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. वृद्धाच्या पार्थिवाला अग्नीडाग दिल्यानंतर काहीवेळात सर्वजण गावाच्या दिशेला निघाले. या दरम्यान, गोपी नावाचा आरोपी त्याच्या आणखी एका जोडीदारासह स्मशानभूमीत आला. तिथे त्यांनी पेटती चिता निखाऱ्यांमधून बाहेर काढली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचं शीर कापत धड वेगळं केलं. त्यानंतर ते शीर लपतछपत घरी घेवून गेले.

आरोपींचं हे सर्व कृत्य गावातील एका व्यक्तीने पाहिलं. त्या व्यक्तीने मृतक वृद्धाच्या नातेवाईकांना आणि गावातील नागरिकांना सांगितलं. त्यानंतर अल्पावधीतच या प्रकाराची माहिती गावात पसरली. मृतक वृद्धाचे नातेवाईक संतप्त झाले. ते गावकऱ्यांसह आरोपी गोपीच्या घराकडे निघाले. तिथे गेल्यावर मोठा गदारोळ झाला. गोपीचा पिता हा मांत्रिक आहे. त्याला मृतदेहाच्या शीराचा अघोरी प्रयोग करायचा होता. त्यामुळे त्याने आपल्या मुलाला शीर आणायला सांगितलं होतं. मृतक वृद्धाच्या नातेवाईकांनी गोपी आणि त्याच्या पिताला त्यांच्या कृत्याचा जाब विचारला. यावेळी गावकऱ्यांनीदेखील हल्लाबोल केला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या दरम्यान काही सुजाण गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळाच्या दिशेला धाव घेतली. पोलीस योग्यवेळी घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा राडा रोखण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी आरोपी गोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. पोलिसांनी गोपीच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना मृतदेहाचं कापलेलं शीर सापडलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता गोपीच्या वडिलांनीच त्याला स्मशानभूमीतून मृत वृद्धाचं शीर घेवून आणण्यास सांगितलं होतं, अशी माहिती समोर आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Post a Comment

1 Comments

  1. After that, subsequent transactions get delivered quicker than the first attempt. At their alternative, players cane, extract software purposes for all types of portable gadgets, which makes it more simple to position stakes at 바카라 카지노 their discretion. All the games supplied at Jackpot City casino works smoothly across cellular entry, flash-play mode, in as a lot as the hand-held system in use is significantly new-fashioned. I’ve had enjoyable, especially with their cellular casino, but overall it’s going to be one other unfortunate shedding weblog, bar a miracle. This is a normal video poker recreation, with no wildcards and the only exception is the excessive payout on the royal flush hand combinations.

    ReplyDelete