-->

Ads

उमरखेड टाकळी( ई ) आदर्श ग्रामपंचायतच्या वाटेवर उच्चशिक्षित महिला सरपंच यांनी उचलला ग्रामविकासाचा विडा


उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव उमरखेड तालुक्यातील टाकळी ईसापुर गाव सध्या तालुक्यात आदर्श ठरत असून उच्च शिक्षित सरपंच सौ उज्वला हाके यांनी गावाचा विकास कारण्याचा विडा उचलल्याचे सध्या चित्र दिसत आहे. "जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जग उद्धरी" असे म्हटले जाते. स्त्री हे आदी शक्ती चे रूप असून पुरुषा पेक्षा सरस कार्य करू शकते हे आपण पाहिलेले आहे. राष्ट्रपती पासून पंतप्रधान पर्यंत महिलांनी पदे भूषवून उत्कृष्ट कार्य केले आहे. याच आदर्शाच्या पावालवार पाऊल ठेवत सौ उज्वला हाके ह्या कार्य करत आहेत. त्यांच शिक्षण बीए बी एड  झालेला आहे ग्रामपंचायत टाकळी अंतर्गत येणाऱ्या गावाचा विकास कसा करता येईल या हेतूने गावात  कार्य करीत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद अंगणवाडी किंवा शासकीय कार्यालय या कार्यालयावर फिल्टर आरो प्लांट बसवणे   त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा होण्यासाठी व शिक्षणाचे आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शाळा डिजिटल करणे   . 

सरपंच

पदावर येताच उज्वला ताई हाके यांनी , स्वखर्चातून रस्त्यावर मुरूम टाकला.


या त्यांच्या कार्यामुळे गाव आता टाकळी गाव विकासाच्या वाटेवर असून लवकरच आदर्श ग्राम ठरणार आहे. उज्वला ताई हाके यांनी बोलताना सांगितले कि, यापुढे आता त्या महिलांसाठी कार्य करणार असून, महिला सबलीकरण या मुद्द्यावर कार्य करायचे आहे.  तरुण विभक्त विधवा महिलांना. व त्यांना समाजा मध्ये ताठ मानेन जगता यावे या साठी सक्षम बनवायचं आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या या कार्यात टाकळी ग्रामपंचायत चे उपसरपंच सदस्य सचिव यांची खंबीर साथ असून सहकारी ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा त्यांना वेळो वेळी सहकार्य करत असतात त्यामुळेच आता टाकळी इसापूर ग्रामपंचायत आदर्श ठरेल यात दुमत नाही.

Post a Comment

0 Comments