काही दिवसांनी नदीत आईचा मृतदेह तरंगताना पाहून या घटनेचा खुलासा झाला.
Karnataka man throws mother in river: कर्नाटकमधून एक
अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे यादगिर (Yadgir) जिल्ह्यात 38
वर्षीय व्यक्तीने कथितपणे आपल्या 60 वर्षीय आईला भीमा नदीत (Bhima river)
फेकून त्यांचा जीव घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव भीमाशंकर
यालिमेली (Bheemashankar Yalimeli) असल्याचं समोर आलं आहे. त्याने आपला
मित्र मुत्तप्पा वद्दार (Muttappa Vaddar) याच्या मदतीने हा धक्कादायक
प्रकार केला.
आईचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता..
बुधवारी जेव्हा महिलेचा मृतदेह नदीत तरंगताना दिसला तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा हत्येचा प्रकार असल्याचं समोर आलं. भीमाशंकरने सांगितलं की, आई आजारी असल्यामुळे पत्नी वैतागली होती. त्यामुळे त्याने आईला नदीत फेकून मारून टाकलं.
पोलिसांना दोघांना केली अटक...
टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आईच्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. यावरुन त्याचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यामुळे भीमाशंकर आणि त्याच्या मित्राने आईच्या हत्येचा कट रचला. याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
0 Comments