-->

Ads

ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीसाठी फोन आला तर सावधान, जळगावमध्ये तरुणाचे मोठे नुकसान


  झटपट पैसे दुप्पट करण्याचे आमिष देऊन सर्रासपणे लोकांची फसवणूक होत असल्याची प्रकरणं समोर येत आहे. जळगावमध्ये (jalgaon) पुन्हा एकदा एका तरुणाला ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे (investing in trading) आमिष दाखवून तब्बल 8 लाख 85 हजारांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणाने अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र सिडाम असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रेंडिंगमध्ये नफा मिळून देण्याचे आमिष दाखवून 8 लाख 85 हजारात ऑनलाईन फसवणूक केली आहे.  याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

देवेंद्र सिडाम यांना २६ डिसेंबर २०२१ ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान विविध अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला. फोनवर त्यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीचे प्लॅन सांगण्यात आले. गोल्डबार्स यामध्ये 'ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल' अशी बतावणी संबंधितांनी केली.

यावर विश्वास ठेवत देवेंद्र सिडाम यांनी ८ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. सिडाम यांनी केलेल्या या गुंतवणुकीवर 25 लाख रुपयांचा नफा झाल्याचा असल्याचेही संबंधित अनोळखींनी फोनवरुन बोलताना सिडाम यांना सांगितले. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत कुठल्याही नफ्याची रक्कम सिडाम मिळाली नाही.

सिडाम यांनी अनेक वेळा त्या व्यक्तीला फोन करून पैशाची मागणी केली, पण प्रत्येक वेळी त्याने टाळाटाळ केली. जरा नफा देत नसेल तर गुंतवणूक केलेले ८ लाख ८५ हजार रुपये परत द्यावे अशी मागणीही सिडाम यांनी केली. पण, ती रक्कमही परत देण्यात येत नव्हती. अखेरीस आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच सिदाम यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Post a Comment

0 Comments