-->

Ads

हाताची नस कापून रक्ताने सुसाइड नोटमध्ये लिहिलं...; तरुणीच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!

                                     तरुणीला प्रेमाची अशी शिक्षा भोगावी लागली. 

भोपाळ, 3 एप्रिल : Indore Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूर येथून 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने हाताची नस कापून रक्ताने सुसाइड नोट लिहिली. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका विवाहित तरुणावर प्रेम करीत होती. त्याच व्यक्तीने तरुणीला धमकी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं नाव शिवानी आहे. शिवानीने घरात गळफास घावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. शिवानीने हाताची नसदेखील कापली होती. तिच्याजवळ एक सुसाइट नोटही सापडली आहे. ज्यात तिने प्रियकराचं नाव लिहिलं होतं. तिने लिहिलं की, दीपक माझं तुझ्यावर प्रेम आहे. जिवंतपणी मी तुझी होऊ शकले नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं. त्यामुळे मी माझ्या मर्जीने आत्महत्या करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकचं एक दुकान होतं. त्याचं शिवानीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. कुटुंबीय शिवाजीनं लग्न लावून देऊ इच्छित होते. विजयनगरमध्ये स्थळही पाहण्यात आलं होतं. एका दीपक आणि शिवानी यांना लपून छपून भेटत असताना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर शिवानीच्या काकांनी दीपकला समजावलं होतं. तर दीपकच्या पत्नीने शिवानीला धमकी दिली होती.

Post a Comment

0 Comments