-->

Ads

उमरखेड उपविभागीय अभियंता यांच्यावर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करून उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते बिटरगांव या रस्त्याचे तात्काळ नुतनिकरण, डांबरीकरण करा

उमरखेड

['प्रहार' चे, उपविभागीय अधिकारी  यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन]

उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते बिटरगांव या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने पायी चालणे सुध्दा अवघड झाले असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असून मागील वर्षभरापासून 5 ते 6 अपघात होऊन निष्पाप नागरीकांचे मृत्यू सुध्दा या अपघातात झालेला आहे.

       या मार्गावरील वाहतूक जवळपास 40 गावांना जोडणारी आहे.

या जीवघेण्या रस्त्याबाबतचे नुतनिकरण, डांबरीकरण करण्याकरीता या भागातील नागरीकांनी, पत्रकार बांधवांनी निवेदन देऊन सदर रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीला घेऊन अनेक आंदोलने सुध्दा केली. परंतु उमरखेड उपविभागीय अभियंता हे बघ्याची भूमिका घेत सदर रस्त्याकडे वेळोवेळी दुर्लक्ष करीत आहेत,निवेदन व आंदोलनाची कुठल्याही प्रकारे दखल अभियंत्याकडून घेतल्या गेली नाही.

      याच अभियंत्याच्या दुर्लक्षीतपणामुळे काल दि. 11/04/2022 रोजी सो. तनाशा अविनाश ठोके वय

30 वर्ष, स. हिंगोली ही बंदीभागातील मन्याळी येथील वसंतराव नरवाडे यांची कन्या तनाशा हिचा हिंगोली येथील अविनाश ठोके यांच्याशी विवाह झाला होता.

       प्रसुतीसाठी तनाशा माहेरी आली होती.रविवारी तिला असाहय प्रसुती वेदना सुरु झाल्या त्यामुळे आजी, आई आणि भावजीसोबत एका वाहनातून ढाणकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जात होते. सायंकाळच्या सुमारास सर्वजन •वाहनातून ढाणकीकडे निघाले मात्र खड्डेमय रस्त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. ढाणकीपासून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील चिचोली फाट्याजवळ धक्के बसून वाहनातच तनाशाची प्रसुती झाली.

     मात्र खड्डेमय रस्त्यांच्या धक्क्यांमुळे काही क्षणातच नवजात बाळ दगावले त्यानंतर काही वेळातच तनाशानेही जगाचा निरोप घेतला. ही घटना तनाशा ही दुरावस्था असलेल्या रस्त्यामुळे वेळेवर आरोग्य केंद्रापर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे या घडलेल्या घटनेला या रस्त्याच्या अतिगांभीर्य अशा विषयाकडे उपविभागीय अभियंता यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना या घटनेचा दोषी ठरवून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्वरीत या रस्त्याचे दुरुस्ती डांबरीकरण करून या नंतर अशा घटना होऊ नये व निष्पाप नागरीकांचा बळी जाऊ नये याची दक्षता घ्यावी.

        अन्यथा आमच्या पक्षातर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनावेळी काही अनुचित प्रकार घडून जिवीत हाणी झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची दक्षता घ्यावी, यावेळी सय्यद माजिद, तालुका प्रमुख,राहुल मोहितवार, शहर प्रमुख,विवेक जळके, प्रसिद्धी प्रमुख, अभिजित गंधेवार, अंकुश पानपट्टे,मनोज वानखडे, उपस्तित होते.

Post a Comment

0 Comments