-->

Ads

Bhandara Crime: प्रेम प्रकरणाची मुलीच्या आईला कळालं अन् भीतीने 21 वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवलं, घटनेने गाव हादरलं

 Maharashtra News: 21 वर्षीय तरुणाने यापूर्वीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता तिसऱ्यांदा त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.




    भंडारा, 10 एप्रिल : एका 21 वर्षीय युवकाने स्वताच्या शेतात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास (21 year old committed suicide) घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील (Lakhani Taluka Bhandara) सोमलवाडा येथे ही घटना आहे. क्रिष्णा शालिक अतकरी (21 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. मृतक क्रिष्णा याचे त्याच्या गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध जुळले होते.

    या प्रेमसंबंधांची माहिती संबंधित मुलीच्या आईला मिळाली. त्यानंतर मुलीच्या आईने क्रिष्णासोबत भांडण केले. आता आपली बदनामी गावभर होणार असल्याची भीती बाळगून क्रिष्णा याने टोकाचं पाऊल उचललं. क्रिष्णा याने स्वतःच्या शेतात जाऊन झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    या आधी सुद्धा क्रिष्णा याने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काल भांडण होताच रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोधाशोध केली, मात्र क्रिष्णा दिसला नाही. आज सकाळी गावातील एका व्यक्तीला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.


    नंतर या प्रकरणाची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात आता पोलीस अधिक तपास करत आहेत.

    तरुणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळ्याचं गूढ अखेर उकललं

    चंद्रपुरातील शीर बेपत्ता असलेल्या विवस्त्र अवस्थेतील युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या हत्या प्रकरणाचं गूढ अखेर उकललं आहे. एकाच रूममध्ये वास्तव्याला असलेल्या दोन मैत्रिणींच्या वादातून ही हत्या झाल्याचा दावा चंद्रपूर पोलिसांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात तेलवासा भागात 4 एप्रिल रोजी सकाळी निर्जन जागी युवतीचे विवस्त्र शव आढळले होते.

    घटनास्थळी कुठलाच पुरावा अथवा युवतीची ओळख पटविणारी बाब आढळून आली नाही. त्यामुळे तपास यंत्रणा दीर्घकाळ अंधारात होत्या. पोलिसांची सायबर शाखा यासाठी अहोरात्र काम करत होती. त्यातून मुलगी नागपूजवळ रामटेक येथील रहिवासी असून कुटुंबापासून वेगळी राहत असल्याने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती.

    घटनेच्या दिवशी आरोपींनी या निर्जन ठिकाणी युवतीला दुचाकीवर घेऊन जात भांडण उकरून काढत धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचे उघड झाले. पुरावा मिळू नये यासाठी तिला विवस्त्र करत डोकं धडावेगळे करत सर्व वस्तू-मोबाइल देखील नाहीसे केले. पोलिसांनी सायबर शाखेच्या तांत्रिक तपासात पुढे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला अटक केली

    Post a Comment

    0 Comments