परिसरात गोळीबार होताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शिनाख्त सीमा(39), दोन मेहुणे सुरेंद्र (36)आणि विजय(33) अशी मृतांची नावे आहेत. पायामध्ये गोळी लागल्यानंतर विजयची पत्नी बबीता(33) हिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आरोपी हितेंद्र याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हितेंद्रची पत्नी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या माहेरच्या लोंकाना घरी बोलवत असे. त्यामुळे हितेंद्रला राग यायचा. रविवार घडलेल्या घटनेचे मुळ कारण पत्नीचे माहेर म्हटले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा हितेंद्र दारुच्या नशेत होता. पोलिस त्याची झडती घेत आहे. त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेंद्र आणि त्याचे कुटूंब शकूरपुर गावामध्ये चार मजली इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहतो. घरामध्ये पत्नी सीमा यादवसह दोन मुलं प्रथम यादव (19) आणि जय यादव (16) असे हितेंद्रचे कुटूंब आहे. हितेंद्रने बाकी संपूर्ण इमारत ही भाड्याने दिलेली आहे. त्यामुळे त्याची अर्थिक बाजू चांगली आहे. यातून तो कुटूंबाचा खर्च सांभाळतो. हितेंद्रला दारुचे व्यसन असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
अनेक छोट्या मोठ्या कारणांवरुन दोघांच्या सतत वात होत असत. रविवारी रात्री हितेंद्र दारुच्या नशेत होता. सीमाने जेवणासाठी डाळ बनवली होती. हितेंद्रने जेव्हा जेवणासाठी विचारले तेव्हा डाळ करणार असल्याचे तिने सांगितले. या गोष्टीवरु त्याचा राग टोकाला गेला. तो पत्नीला शिवीगाळ करु लागला.
त्यानंतर सीमाने आपल्या माहेरी भावाला फोन केला. त्यानंतर पत्निच्या माहेरची तिच्या घरी पोहचली. दोघांमध्ये वाद सुरु झाला. अचानक हितेंद्र आपल्या रुममध्ये गेला आणि लायसन्स असलेली रिवाल्वर घेऊन आला. येताच त्याने पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांवर गोळीबार केला.
या हल्ल्यात सीमा, सुरेंद्र, विजय आणि बबीता यांना गोळी लागली. या हल्ल्यात सीमाची आई कृष्णा बचावल्या. अचानक गोळीबार झाल्याने शेजारचे लोक बाहेर आले. सर्व काही पाहून सर्वांना धक्का बसला. चौघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोळी लागलेल्या सर्वांना रुग्णलयात नेण्यात आले पण त्यांना मृत घोषीत करण्यात आले. केवळ बबीता वाचली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
प्रथम चौकशी केली असता, त्यामध्ये पत्नी सीमा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या माहेरच्यांना फोन करते. त्यामुळे हितेंद्रची चिडचिड होत असे. त्याचा राग अखेल अनावर झाला. क्राईम टीम आणि एफएसएसची टीम घडलेल्या घटनस्थळाचा तपास करत आहेत.
0 Comments