तील युद्ध सुरूच आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, युक्रेनमधील ल्विव्ह येथील अर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा हटवून अज्ञातस्थळी नेण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा पुतळा लपवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ईस्टर्न युरोपीयन मीडिया संस्था नेक्स्टाने मंगळवारी वृत्त दिले की युक्रेनने रशियन हल्ल्यांदरम्यान ल्विव्ह शहरातील आर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा हटवला आहे. अधिकाऱ्यांनी हा पुतळा अज्ञात ठिकाणी लपवून ठेवला आहे. शेवटच्या वेळी दुसऱ्या महायुद्धादरम्यान येशूची ही मूर्ती चर्चमधून बाहेर काढत लपवण्यात आली होती.

दुसरीकडे युक्रेनने रशियन लष्कराच्या मेजर जनरलला ठार केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांचा युद्धात मृत्यू झाला आहे. मात्र, रशियाकडून याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. एका आठवड्यात हे दुसरे मेजर जनरल आहेत, ज्यांच्या मृत्यूचा दावा युक्रेनने केला आहे. यापूर्वी 3 मार्च रोजी युक्रेनने रशियाचे मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांच्या मृत्यूचा दावा केला होता.
0 Comments