-->

Ads

लग्नानंतर दुसरी रात्र 'लॉक अप'मध्ये, हळदी समारंभात केलेला कांड नवरदेवाच्या अंगलट

बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. हळदी समारंभात (haldi ceremony ) केलेलं कृत्य एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला पोलिसांनी अटक (Groom arrested) केली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहित तरुणाला अशाप्रकारे तुरुंगाची हवा खावी लागल्याने दोन्हीकडील कुटुंबावर नामुष्की ओढावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाची भास्कर चाटे (साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला होता. या लग्नात शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. अगदी आनंदात आणि थाटामाटात हा हळदी समारंभ पार पडला होता. पण हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बालाजीने आपल्या मित्रांसोबत बेधुंद होऊन डान्स केला.

पण थोड्याच वेळात आनंदाच्या भरात बालाजीच्या काही मित्रांनी स्वत: जवळील बंदूक काढून हवेत गोळीबार (Gun firing) केला आहे. यावेळी बालाजीने देखील हातात बंदूक घेत हवेत फायरींग केली. दरम्यान उपस्थित असणाऱ्या एकाने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई पोलिसांनी नवरदेव बालाजी चाटेसह, शेख बाबा आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला. 

अवैधरित्या बंदूक हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला अटक केली आहे. हळदी समारंभात गोळीबार करणं या नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. अंबाजोगाई सारख्या शांतताप्रिय शहरात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेचा पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments