-->

Ads

कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे; अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबादेतील थरकाप उडवणारी घटना

 Murder in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील शफेपूर गावात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील तरुणानं आपल्या एका साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीला भयंकर मृत्यू दिला आहे.



औरंगाबाद, 31 मार्च: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शफेपूर गावात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील तरुणानं आपल्या एका साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीला भयंकर मृत्यू (Boyfriend killed girlfriend's husband) दिला आहे. अनैतिक संबंधातून (Immoral relationship) झालेल्या वादावादीनंतर आरोपीनं क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीनं आपल्या साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीची निर्घृण हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे (dead body cut into 2 pieces) केले आहेत. थरकाप उडवणारी घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर संदीप मोकशे असं निर्घृणपणे हत्या झालेल्या मृत व्यक्तीचं नाव आहे. दोन्ही आरोपी आणि मृत असे तिघेही औरंगाबाद जिल्ह्याच्या शफेपूर गावातील रहिवासी आहेत.


टीव्ही9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, मृत संदीप मोकशे याच्या पत्नीचं गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या अनैतिक संबंधाची माहिती संदीप मोकशे यांना मिळाल्यानंतर, त्यांच्या पत्नीच्या प्रियकराशी जोरदार भांडण झालं. या वादानंतर पत्नीच्या प्रियकराने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या संदीप यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार आरोपी प्रियकराने गावातील अन्य एकाच्या मदतीने संदीप मोकशे यांची निर्घृण हत्या केली.


नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी मृतदेहाचे दोन तुकडे करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाचा झालेली अवस्था पाहून पोलीस देखील हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गावातील सुनील हरणकाळ आणि छोटू मोकशे अशा दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments