राजस्थानमध्ये (Rajasthan News) एका तरुणीचा मनगटावरील नस कापल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर (Crime News) आली आहे. या प्रकरणात आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. चौकशीमधून आलेल्या माहितीनुसार, घरातून पळून जाण्याच्या मुद्द्यावरुन प्रेयसी आणि प्रियकरामध्ये वाद झाला होता. यात प्रेयसीन हाताची नस कापण्याची धमकी दिली होती. त्यावेळी रागाच्या भरात प्रियकराने चाकू तिच्या हातावर फेकला. दुर्दैवाने चाकू हातावर लागला आणि नस कापली गेली. अधिक रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोपी राहुल सांखला (21) याला अटक करण्यात आली आहे. तो एका खासगी कॉलेजात BA च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितलं की, शेजारी राहणाऱ्या काजलवर (18) त्याचं प्रेम होतं. ती 12 वीत शिकत होती. गेल्या दीड वर्षांपासून दोघे प्रेम संबंधात होते. दोघांनाही लग्न करायचं होतं. याबाबत दोघांच्या कुटुंबालाही माहिती होती. 18 वर्षांची झाल्यानंतर काजल त्याला घरातून पळून जाण्यासाठी दबाव आणत होती. काजल पुढे शिक्षण घेण्यासही नकार देत होती.
राहुल सांखलाने पोलिसांना सांगितलं की, बुधवारी सकाळी दोघांच्या कुटुंबीय आपआपल्या कामावर निघून गेले. सकाळी साधारण 9.30 वाजता काजल घरात एकटे असल्यामुळे राहुल भेटण्यासाठी घरी गेला होता. पळून जाण्याच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीला मारहाण केली. नंतर तेथून निघून गेला. तब्बल अर्ध्या तासानंतर बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या काजने त्याला इशारा केला. इशाऱ्यातून तिने हाताची नस कापीन अशी धमकी देऊन बोलावलं. रागाच्या भरात तो पुन्हा काजल्याच्या घरी पोहोचला. चौकशीत राहुलने सांगितलं की, काजलने आपल्या हाताची नस कापल्याची धमकी दिली. हे ऐकून त्याने काजलला धडा शिकवण्याचा विचार केला. मीच कापतो तूझ्या हाताची नस असं म्हणून तो पुन्हा तिच्या घरी गेला.
रागाच्या भरात राहुलने फ्रीजवर ठेवलाला चाकू उचलला आणि काजलला घाबरवण्यासाठी तिच्या हातावर हळूच फेकला. त्याला मारण्याचा हेतू नव्हता. काजलसोबत झटापटीत चाकू डाव्या हाताच्या मनगटात घुसला. काजला नस कापली गेल्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला. ती जमिवीर कोसळली आणि बेशुद्ध झाली. काजलला सांभाळत असताना राहुलचे कपडे रक्ताने माखले. राहुल चाकू घेऊन बाहेर पडला आणि कॉलनीच्या बाहेर एका झाडाखाली चाकू लपवला.
0 Comments