प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील कोरोना योध्दांवर राजकीय यांच्या दबावाला बळी पडून दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आज चौथ्या दिवशी इस्लामपूर शहरातील आष्टा नाका परीसरातील लोकनेते राजारामबापु पुतळ्या समोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मधील डाॅक्टर व सहकारी स्टाफवर राजकीय व्देषातुन राजकीय यांच्या हुकुमशाहीला बळी पडून पोलिस व आरोग्य अधिकारी चौकशीचा फार्स करुन खोटे गुन्हे दाखल करीत आहे.तक्रार दाखल करणारे ही राजकीय यांचे समर्थक आहेत.हे खोटे गुन्हे मागे घ्यावेत व आम्हा कोरोना योध्दांना न्याय द्यावा या मागणीसाठी प्रकाश कामगार युनियन च्या वतीने आज चौथ्या दिवशी राजकीय हुकुमशाहीचा,पोलिस व आरोग्य अधिकारी यांच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन केले.
0 Comments