-->

Ads

अकोल्यात अभियंत्याकडून पत्नीचा लैंगिक छळ, घटस्फोटानंतरही सुरू होता विकृत प्रकार

 

Crime in Akola: अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका अभियंत्याने आपल्या पत्नीचा लैंगिक छळ (Sexual harassment) केला आहे.





    अकोला, 06 मार्च: अकोला (Akola) शहरातील जुने शहर पोलीस ठाण्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका अभियंत्याने आपल्या पत्नीचा लैंगिक छळ (engineer sexually molest wife) केला आहे. आरोपीच्या छळाला कंटाळून पीडित महिला घर सोडून गेल्यानंतर आरोपी अभियंत्यानं भलताच आरोपी केला आहे. या आरोपीनंतर पीडित महिलेनं जुने शहर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करत तपासाला सुरुवात केली आहे.

    दिव्यकुमार शर्मा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचं नाव असून तो बुलडाणा येथील जिल्हा परिषदेत अभियंता म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे 2013 रोजी पीडित महिलेचा वाडेगाव येथील दिव्यकुमार शर्मा याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस दोघांनी आनंदाने संसार केला. दरम्यानच्या काळात त्यांना एक मुलगा देखील झाला. पण मुलाचा जन्म झाल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले.वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळून पीडित महिला आपल्या मुलासह माहेरी निघून गेली. तसेच दोघांनी घटस्फोट देखील घेतला. पण कालातरानं आरोपीनं पीडित महिलेशी गोड बोलून पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले. यातून दोघांनी पुन्हा मंदिरात जाऊन लग्न केलं. पण आरोपीचा त्रास काही कमी झाला नाही. आरोपीनं अनेकदा पीडित महिलेचा लैंगिक छळ केला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिला पुन्हा आपल्या माहेरी निघून गेली.


    पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर आरोपी पतीनं आपली पत्नी एका ठाणेदारासोबत पळून गेल्याचा आरोप केला. या प्रकरणानंतर पीडित महिलेनं अकोल्यातील जुने शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

    Post a Comment

    0 Comments