भंडारा वैनगंगा नदी पात्रातील संगम बेट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारु हातभट्टयावर छापावर कारवाई
भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हान यांचेसह पथकाने दिनांक ५ फे ब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४.३० वा. पासुन जवाहरनगर पोलीस स्टेषन अंतर्गत वैनगंगा नदी पात्रातील संगम बेट परिसरात सुरू असलेल्या अवैध दारु हातभट्टयावर छापावर कारवाई करीत लाखो रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
सदर अवैध मोहाफुल दारुच्या भट्टया या नदीच्या पात्रातील दुर्गम बेटावर ज्या ठिकाणी सहजा सहजी कोणीही पोहचु शकणार नाही व कोणलाही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी लावलेल्या असल्यामुळे व पाण्याची खोली जास्त असल्याने त्या ठिकाणी जाणे दुरापास्त होते. पोलीस पथकांनी खाजगी बोटीचे साहाय्याने लाईफ जॉकेटसह जिवावर बेतनारे प्रवास करुन सर्च ऑपरेशन राबविले असता नदी पात्रातील बेटावर, नदीच्या किणा-यावर काही ठिकाणी अवैध मोहाफुल दारुच्या भट्टया आढळुन आले. संगम बेटावर पोहोचुन बेटावर असलेल्या जंगल झाडी झुडपीत दारुचे अड्डयांचे शोध घेतला असता रविंद्र श्रावण मेश्राम वय ५२ वर्षे रा. तिड्डी ता. जि. भंडारा , देवराम कृष्णाजी बोरसरे वय ३७ वर्षे रा. तिड्डी ता. जि. भंडारा ,राकेश बाबुलाल मेश्राम वय ३० वर्षे रा. संगम पुनर्वसन ता. जि. भंडारा व संजय बाबूराव खंगार वय ३७ वर्षे रा. तिड्डी ता. जि. भंडारा हे मोहाफुलाची हातभट्टी लावुन वेगवेगळ्या ०३ चुलीवर लोखंडी ड्रम मांडुन अवैधरित्या दारु गाळतांनी मिळुन आले. घटनास्थळाचे परीसराची पाहणी केली असता २७४० किलो सडवा मोहापास, ९०. मातीचे मडके, ३० प्लास्टीक ड्रम, ०३ जर्मन घमेले, लोखंडी ड्रम, लाकडी टवरे, अंदाजे २,००० किलो जळाऊ लाकडे, दारुने भरलेले रबरी टयुब व ईतर साहीत्य असा एकुण ३ लाख ८३ हजार ८००/-रु. चा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुद्देमाल जलमार्गाने आणणे शक्य नसल्याने त्याचा मुद्देमाल तिथेच नष्ट करण्यात आला. तसेच बाजुचे बेटावरील अज्ञात ईसमाचा २३० किलो सडवा मोहाफास व ४० प्लास्टीक ड्रम समुळ नष्ट केला.
0 Comments