स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वरी... अशा अक्षरशः शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगशकर (Lata Mangeshkar)यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. लता दीदींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक प्रकारची न भरुन निघणारी पोकळी निर्माण असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. अशा आशयाचे ट्विट करत लता दीदींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
तसेच, दुसरे ट्विट करत लता दीदींनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, त्यांना नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल उत्कट होती. त्यांना नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता. अशी भावनादेखील मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडीत 29 दिवसांपासून उपचार सुरु होते. संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक करण्यात येत आहे.
0 Comments