सालाबादप्रमाणे यंदाही
दैनिक अंबरनाथ टाइम्सने शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष नायक हे विशेषांक प्रकाशित केले. शनिवार दि. 5 फेब्रुवारी रोजी अंबरनाथ शहर शाखेत या विशेषांकाचे प्रकाशन खुद्द अरविंद वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंबरनाथ टाइम्सचे कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी, पत्रकार प्रफुल्ल केदारे, पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पवार, माजी नगरसेवक उमेश पाटील, एड. निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, अरविंद मालुसरे आदी उपस्थित होते.
सदर विशेषांकात वलेकरांचा संपूर्ण जीवन प्रवास आणि शिवसेना पक्ष बळकटीकरण व पालिकेत सतत 25 वर्षे सत्ता टिकवून ठेवण्यासाठी केलेला संघर्ष यावर आवर्जून लेख समाविष्ट करण्यात आले आहेत, यासाठी वाळेकर यांनी सदर विशेषांकाचे भरभरून कौतुक केले.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments