कल्याण आडीवली आठवडा बाजार फेरीवाले हफ्ता प्रकरणास वेगळे वळण
माझी नगरसेवक कुणाल पाटील समर्थकांनी पैसे मागत नसल्याचा दावा
कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात काल एक व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या प्रकरणात फेरीवाल्याकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला गेला. एका महिलेने तिच्याकडून काही लोक स्टॉल लावण्याच्या बदल्यात जबरदस्तीने पैसे मागत असल्याचा व्हिडीओ देत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी माजी नगरसेवकासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता . मात्र या प्रकरणास आत्ता नवे वळण लागले आहे या परिसरात स्टॉल लावण्याऱ्या कुणाल पाटील समर्थक फेरीवाल्यानी आमच्याकडून कुणाल पाटील किव्हा त्याचे कार्यकत्र्यानी स्टॉल लावण्याच्या बदल्यात कधी पैसे मागितले नसल्याचे सांगितले मात्र काही महिन्यापूर्वी या सर्व फेरीवाल्यानी पालिका व पोलिसांना एक अर्ज दिला होता. त्या अर्जात त्यांनी काही लोकांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप केला होता. मात्र पोलिसांनी त्या अर्जाचा तपास केला नसून त्यांही पत्राची चौकशी करण्याची मागणी फेरीवाले महिलांनी केली आहे.
0 Comments