-->

Ads

बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न नवरेनगर विभागप्रमुख मिलींद गान व चंदा गान यांचे अयोजन


 उस्मान शाह, अंबरनाथ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रं. ४० मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन हळदीकुंकू समारंभ व पिशवी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे आयोजन नवरेनगर विभागप्रमुख मिलींद गान व उपशहर महिला संघटक चंदा गान यांनी केले होते, शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्याहस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर नागरिकांना बहुपयोगी पिशवींचे वाटप करण्यात आले.

         याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर, ऍड. निखिल वाळेकर, विजय पवार, राजू शिर्के, प्रज्ञा बनसोडे, पदमाकर दिघे, प्रकाश डावरे, किशोर सोरखांदे, गणेश आयवले, राजकुमार सिंग, संदीप मोरे आदींसह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments