-->

Ads

अकस्मात मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाच्या नातेवाईकांचा शोध अंबरनाथ पोलिसांनी केले नागरिकांना आवाहन

गेल्या 24 डिसेंबर रोजी रात्री अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन रोडवर असलेल्या राजेश मोबाईल दुकानाच्या पाठीमागे येथील वाचमनला एक माणूस झोपलेला दिसला, त्याच्या शरीराची कोणतीच हलचल होत नसल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीला छाया रुग्णालयात घेऊन गेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


 सदर मृत व्यक्ती ही साधारण 60 वर्षे वयाचा पुरुष असून डोक्यावर समोरच्या बाजूने टक्कल आणि काळी पांढरी दाढी मिशी वाढलेली आहे. अंगात मळकट पांढऱ्या हिरव्या रंगाचा हाफ शर्ट व चॉकलेटी कलरची हाफ पॅन्ट आहे. सदर मृत व्यक्तीच्या नातेवाईक किंवा वारसांचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी हे जाहीर आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments