-->

Ads

अंबरनाथमध्ये रसायन भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात विचित्र अपघातात दोन रिक्षा प्रवाशांचा जागीच मृत्यू


अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी परिसरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी एक विचित्र आणि भीषण अपघात झाला, यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

          गंधक नावाचा रसायन घेऊन कटाई नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक मधून रसायनाच्या काही पिशव्या मागील कार वर पडल्या, त्यामुळे कारने तात्काळ पेट घेतला, हा प्रकार पाहून घाबरलेल्या ट्रक चालकाने गाडी सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर सदर ट्रक कार आणि एका रिक्षाला धडकला, यामुळे रिक्षाने ही पेट घेतला आणि रिक्षात बसलेल्या दोन प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

         घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ नगरपालिका आणि आनंदनगर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी ही घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास सुरू केला.


उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments