अंबरनाथमध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
पोलिसांनी काही तासातच आरोपीला केली अटक
नववर्षाच्या पहिल्याच रात्री अंबरनाथमध्ये एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. अंबरनाथ पश्चिमेकडील कल्याण बदलापूर रोड जवळील डीएमसी कंपनीच्या मोकळ्या जागेवर शनिवारी रात्री हा प्रकार घडला. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेहाला ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली असता तो बुवापाडा परिसरात राहणारा असून रवी तिवारी असे त्याचे नाव असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच समीर आसिफ मोमीन या आरोपीला अटक केली. एका कंपनीत लेबर पुरविण्याच्या कारणावरून त्याचा मृत रवीशी वाद होता, म्हणून त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी शनिवारी रात्री समीरने त्याला भरपूर दारू पाजली आणि नशेचा फायदा घेत त्याच्या डोक्यावर दगड टाकून त्याची हत्या केल्याची कबुली समीरने दिली असल्याची माहिती परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments