-->

Ads

आरक्षित जागेवर झालेल्या अतिक्रमण विरोधात आमरण उपोषण पुरुषोत्तम नल्लासेवी यांच्या उपोषणाला आरपीआय आणि भाजपचा पाठींबा




अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी शासकीय जागेवर झालेल्या अतिक्रमण विरोधात वारंवार तक्रार करून सुद्धा पालिकेचे अतिक्रमण विरोधी विभाग त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही यासाठी पुरुषोत्तम नल्लासेवी यांनी सदर अतिक्रमानांवर कारवाई करण्यात यावी या मागणी साठी पालिकेजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.

       या उपोषणाला आज तिसरा दिवस असून गुरुवारी भाजपचे अंबरनाथ पश्चिमचे अध्यक्ष राजेश कौठाले यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसाहित भेट देऊन पाठींबा दर्शविला, त्यानंतर संध्याकाळी आरपीआयचे शहराध्यक्ष अरविंद रमण यांनी ही सदर उपोषणाला पाठींबा देणारे पत्र नल्लासेवी यांना दिले, यावेळी त्यांचे इतर पदाधिकारी दिलीप जाधव, जावेद शेख, राहुल खंडागळे, दादासाहेब देठे, गणेश आल्हाट, बाळासाहेब खंडागळे आदी उपस्थित होते.


उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments