६४५ अस्वलाचे ३ ते ७ से मी लांबीचे दात व नखे जप्त
२४/१२/२०२१ रोजी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष , गुन्हे शाखा , ठाणे शहर या पथकातील पोलीस अधिकारी यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , व्हीनस चौक उल्हासनगर ४ येथील कुमार फाईन डाईन या गाळ्यामध्ये अस्वल या प्राण्याची पाढल्या व पिवळसर रंगाची नखे व दात बेकायदेशीररीत्या साठा करून ठेवली आहेत . सदर बातमीच्या अनुषंगाने मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष , गुन्हे शाखा , ठाणे शहर या पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली व्हीनस चौक येथील कुमार फाईन डाईन या गाळयाच्या आतील रूममध्ये छापा टाकुन सदर रूमची झडती घेतली असता सदर रूममध्ये एकुण ६४५ अस्वल या वन्य प्राण्याचे दात , नखे अंदाजे ३ ते ७ से मी दरम्यान लांबीचे पांढरट , पिवळसर रंगाचे एका बाजुला किचित्त टोकदार असलेले मिळुन आले आहेत . त्याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३ ९ ४ / २०२१ वन्य जीव संरक्षण अधिनियम ९ , ३ ९ , ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष , गुन्हे शाखा , ठाणे शहर करीत आहेत
0 Comments