राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचार अशा घटनांवर आळा बसावा यासाठी शक्ती विधयेकला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. या शक्ती विधयेकात बलात्कार, लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली आहे,
सदर शक्ती विधयेकाचे अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले, पूर्वेकडे राष्ट्रवादी तर्फे ढोल ताश्यांच्या गजरात मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, आशा पाटील, अश्विनी पाटील, शहर सचिव धनंजय सुर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments