-->

Ads

फुलसावंगीच्या शा. व्य. स. अध्यक्षपदी रेवती पांढरे यांची निवड




फुलसावंगी प्रतिनिधी / 

            येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या मागील शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपला होता व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे पहिली समिती बरखास्त करून नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या सुचनेचे पालन करत मंगळवारी (३०) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत पाच ते आठवी च्या पालकांची सभा बोलवुन नविन नऊ (९) नवनियुक्त सदस्यांची निवड करण्यात आली, या शाळेत मुलींची संख्या ही जास्त असल्याने व आळी पाळी ने पुरुषाला व स्त्री ला पदाची जवाबदारी देण्याची येथे पध्दत असल्याने त्या रुटिंग पध्दतीने या अगोदर पुरुष अध्यक्ष असल्याने यावेळी  महिलेला हे पद देण्यात आले, यामध्ये सर्व सदस्यांच्या मते  रेवती विवेक पांढरे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर माधव घोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर यावेळी सदस्य म्हणून सिमा कि.खंदारे, राजु भा. मोरे, सुवर्णा वि‌.इटेवाड, ज्योती स. पेंटेवाड, रमेश ना. पाचंगे, गजानन सु. कृष्णापुरे, गजानन शा. आठाव यांची निवड करण्यात झाली.

यांच्या निवडीचे सर्व स्थरातुन स्वागत होत आहे.


Post a Comment

0 Comments