-->

Ads

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध विजय दिनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघाली अमर जवान रॅली



1971 युद्ध विजय दिवस हा स्वर्ण मोहत्सव साजरा करत वाजत गाजत मिरवणूक 



दरवर्षी १६ डिसेंबर या दिवशी भारतात विजय दिवस (विजय दिन) साजरा केला जातो..आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी 6 वाजता या रॅलीला सुरवात झाली व रामनगर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.. विजय दिवस साजरा करण्याची सुरुवात १६ डिसेंबर १९७२ पासून झाली. भारताने १९७१ मध्ये १६ डिसेंबर या दिवशी पाकिस्तान विरुद्धचे युद्ध जिंकले. पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी हातातील शस्त्र जमिनीवर ठेवून भारतासमोर बिनशर्त शरणागती पत्करली. यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. स्वतंत्र झालेला पूर्व पाकिस्तान हाच आज बांगलादेश या नावाने ओळखला जातो. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करण्यासाठी १९७२ पासून दरवर्षी १६ डिसेंबर या दिवशी भारतात विजय दिवस (विजय दिन) साजरा करतात.  भारत पाक 1971 युद्धाच्या भारत विजय दिवस पाळत 

भारताविषयी प्रेम व्यक्त करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक सैनिक या रॅलीत सहभागी झाले.भारताचा विजय दिवस साजरा करताना मशाल पेटवून रॅली काढण्यात आली, तसेच चिमुकल्यानी देशप्रेम व्यक्त करत देशभक्तीपर गीते सादर केली.

Post a Comment

0 Comments