मोबाइल हातात दिल्यावर अनेक लहान मुलांना तोंडात घालायची सवय असते. ही मुलंदेखील तेच करीत होते आणि...
जयपूर, 19 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) अलवरमधून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील एका घरात मोबाइलची (Mobile Blast) बॅटरी फुटल्यामुळे दोन लहान मुलं जळाल्याचं समोर आलं आहे. यावेळी बॅटरी फुटल्याचा मोठा आवाज झाला. ब्लास्टचा आवाज ऐकून कुटुंबीय बाहेर आले. त्यांनी पाहिलं की दोन्ही मुलं रडत होती. एका मुलाचा चेहरा पूर्णपणे जळाला, तर दुसऱ्या मुलाचा प्रायव्हेट पार्टला जखम झाली आहे.
यानंतर तातडीने मुलांना रुग्णालयात नेण्यात आलं. मुलांच्या वडिलांनी सांगितलं की, मुलं सायंकाळच्या वेळेत खाटेवर खेळथ होते. त्यांच्या हातात मोबाइल होता. मध्ये मध्ये ते मोबाइल तोंडात घेत होते. यादरम्यान मोठा ब्लास्ट झाला. मोबाइलमधील बॅटरी फुटल्यामुळे हा ब्लास्ट झाला. यात दोन्ही मुलं जळाले. यानंतर त्या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
0 Comments