-->

Ads

अंबरनाथच्या बेघर निवाऱ्यातील लोकांना साडी व मिठाईचे वाटपभटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आगळी वेगळी भाऊबीज


   नेहमीप्रमाणे अंबरनाथमधील भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील दानशूर लोकांना दिवाळी निमित्त आगळीवेगळी भाऊबीज साजरी करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते, त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडुन मिळालेली मदत हे कार्य यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण ठरते.

    भारतीय संस्कृतीमध्ये सणांमधील उत्साह द्विगुणीत करण्यासाठी भेट देण्याची परंपरा जोपासली जाते, अशाच सामाजिक जाणीवेतून भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आगळी वेगळी भाऊबीज ही संकल्पना राबवली जाते, 

दरवर्षीप्रमाणे अंबरनाथ शहरातील बेघर निवारा केंद्रातील माताभगीनींना साडी व मिठाई वाटून आगळी वेगळी भाऊबीज साजरी करण्यात आली तसेच बेघर निवारा केंद्रातील निराधारानां मिठाई वाटून दिवाळी साजरी करण्यात आली, अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष सुंदर नंदलाल डांगे यांनी दिली.

         याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक बिहारी डांगे, संस्थेचे कार्याध्यक्ष सुनिल धोंडे, संजय चंद्रमोरे, भरत कारंडे, संजय डांगे, उत्कर्ष मिश्रा, सत्यम सोनी, अजय डांगे आदी मान्यवर तसेच स्वयंसेवक नितीन व रेखाताई उपस्थित होते.

उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments