-->

Ads

आदिवासी वाडीतील माताभगीनींना व लहान मुलांना विविध वस्तूंचे वाटप.. अंबरनाथमधील भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम..

 



                   अंबरनाथ : समाजातील निराधार व गरजू लोकांपर्यंत संपन्न असलेल्या दानशूर समाजबांधवांकडून मिळालेली मदत पोहच करने हा भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा उपक्रम यशस्विरित्या पार पाडला जात असून, कल्याण तालुक्यातील मानीवडे गावातील आदिवासी वाडीतील माताभगीनींना साडी व मिठाई चे वाटप तसेच लहान मुलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.

       सर्वसामान्य तसेच गरजू लोकांची सेवा करण्यात विशेष समाधान मिळत असल्याचे तसेच संस्थेच्या पाठीशी भक्कम आधार असलेले दानशूर यांच्या बळावर हे सेवाकार्य अविरत सुरू असल्याचे याप्रसंगी बोलतांना भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सांगीतले.

           तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्याची ईच्छा भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करता आली याचे नक्कीच समाधान मिळत असल्याचे याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती स्मिता गायकर यांनी सांगीतले. आधुनिक समाजातील वंचित लोकांसाठी काही मदत केल्याने आपल्यात समाजाचे  ऋण फेडल्याची भावना जागृत होते असे मत सामाजिक कार्यकर्त्या सविता जोशी यांनी व्यक्त केले.

    गरजू लोकांसाठी दिलेले दान हे खरोखरच गरजवंत लोकांपर्यंत पोहोचते याचा आवर्जून उल्लेख करत संस्थेच्या उपक्रमात भरभरून मदत करण्याचे आवाहन सुनिल धोंडे यांनी केले.

याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, कार्याध्यक्ष सुनिल धोंडे, ज्येष्ठ समाजसेविका स्मिता गायकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता जोशी व संजय डांगे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


उस्मान शाह, अंबरनाथ

Post a Comment

0 Comments