मुंबईतल्या पूर्व उपनगरात असलेल्या आर सी एफ पोलीस स्टेशन अंतर्गत राहुलनगरमध्ये एक पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली.पत्नी आपल्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून ही हत्या केली पोलिसांनी आरोपी पती अक्षय आठवले याला अटक केली आहे.मृतक महिला आकाक्षा वय 21 वर्षे ही धारावीतील एक खासगी रुग्णालयात स्वागतिका म्हणून काम करते.आरोपी अक्षय आठवले याच्याशी 2019 मधे लग्न केले होते त्यानंतर त्यांच्यात नेहमीच वाद होत होते म्हणून ही महिला गेल्या काही महिन्यांपासून आपल्या घरी वेगळी राहू लागली.अक्षय तिच्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्याशी बोलत नव्हती हा राग मनात धरून काल 10 नोव्हेंबर ला ही महिला सकाळी रिक्षाने कामाला जात होती त्यावेळी अक्षय मोटारसायकलवर आला त्याने रिक्षा अडवली आणि हातातल्या धारदार शस्त्राने तीच्यावर वार केले. तिला जखमी अवस्थेत सायन च्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी भरती केले पण तिचा मृत्यू झाला.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आर सी एफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली आहे.
बाळासाहेब घावटे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,आर सी एफ पोलिस ठाणे
0 Comments