नवी मुंबई : उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचारात 4 शेतकरी ठार झालेत. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून व्यक्त करण्यात येतोय. येत्या 11 तारखेला महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले . आज नवी मुंबई येथे आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या एपीएमसी मार्केट मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रभात फेरी काढत व्यापाऱ्यांना 11 तारखेच्या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलेय. एपीएमसी मधील पाचही मार्केट सह सर्व दुकाने केंद्रातील भाजपा सरकार चा निषेध व्यक्त करण्यासाठी 11 तारखेला बंद करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला असून यासाठी विविध माध्यमातून व्यापारी वर्गाला आवाहन करण्यात येतेय.
Byte -: तेजस शिंदे (प्रभारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
३डी न्यूज पनवेल-रायगड प्रतिनिधी राजन लोखंडे
0 Comments