पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आहे. तर प्रकरणाचे गांभीर्य पाहता गाझीपूरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे.
हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यात घडला आहे. ही लाजिरवाणी घटना समोर आल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. इयत्ता सातवीच्या अल्पवयीन मुलीवर सरकारी शाळेच्या खोलीतच बलात्कार करण्यात आल्याने आता शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय.गटशिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी वाहन चालक बऱ्याच शाळेत येत असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी एकटी सापडल्यानंतर त्याने तिच्यासोबत बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कडक भूमिक घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे

0 Comments