उमरखेड ( यवतमाळ ) संजय जाधव अनैतिक संबधामध्ये अडसर ठरत असल्याने पत्नीने गळा आवळून पतीचा खून केला. या हत्याकांडात मृतकाच्या पत्नीने आपल्या प्रियकराची मदत घेतली असून आत्महत्या केल्याचा बनाव केला. ही घटना सावळेश्वर येथे घडली.

भिमराव उत्तम काळबांडे (३०) रा. सावळेश्वर असे मृतकाचे नाव आहे. नेहमी प्रमाणे काल संध्याकाळी जेवण करून झोपलेला असताना पत्नी आणि प्रियकराने अनैतिक संबधामध्ये अडसर ठरणा-या पती उत्तम काळबांडे यांचा गळा आवळुन खुन केला व त्याने आत्महत्या केल्याचा बनाव केला. या घटनेची माहिती सावळेश्वर येथील पोलीस पाटील अनिल कांबळे यानी बिटरगांव पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी बिटरगांव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के यांनी भेट दिली व ठाणेदार प्रताप भोस यांनी या बाबत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप भुजबळ यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली. त्यावरून सहा. पोलीस अधिक्षक अदित्य मिलखेलकर यांनी त्वरीत घटनास्थळी भेट देवुन तपासाच्या सुचना दिल्या. घटना स्थळी परिस्थीती जन्य पुरावे संशयास्पद आढळल्याने आपल्या तपासाचे चक्रे फिरवत संशयित मृतकाची पत्नी व तिचा प्रियकर यांना ताब्यात घेवुन चौकशी सुरू केली. मृतक भिमराव काळबांडे हा अनैतिक संबधामध्ये अडसर ठरत होता. यामुळे मृतकाचे आणि त्याच्या पत्नीचा शाब्दिक वाद होत होता. अखेर अनैतिक संबधामध्ये अडसर ठरणारा हा वाद कायमचा दुर करण्याचा आरोपी मृतकाची पत्नी व तिचाप्रियकरयाने दिनांक 18 आॅक्टोबर रोजी झोपीत असलेल्या भिमराव याला कायमचे संपवण्याचा कट रचत त्याचा गळा दाबत कायमचे संपवले. सकाळी आरोपी पत्नी व तिचा प्रियकरयांने गावात भिमराव काळबांडे यांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा बनाव केला. परंतु त्यांनी केलेला बनाव पोलीसांनी त्यांच्या अंगावर उलवटत भांदवी 302 अंतर्गत गुन्हा नोंद करत आरोपींना ताब्यात घेतले. मृतकाला सावळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.विशेष म्हणजे बिटरगांव पोलीसांनी अवघ्या चार तासात गुन्हा उघडीस आनत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदर तपास ठाणेदार प्रताप भोस व उपनिरीक्षक कपिल मस्के यांच्या मार्गदर्शनात पोहवा रवी आडे, मोहन चाटे, रवी गीते, सतिश चव्हाण, निलेष भालेराव, स्वप्निल रायवाडे, गजानन खरात, देवीदास हाके, विद्या राठोड, सुनिता बिंदे, होमगाडे चंद्रकांत वाढवे, होमगार्ड सचिन यमजलवाड करीत आहे.
0 Comments