उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठी मागची साडेसाती या वर्षी जाण्याचे नाव घेत नाही आहे. सुरवातीला दडी मारून बसलेला पाऊस नंतर मात्र धोधो बरसला शेवटी पावसामुळे हाती सोयाबीन येते कि नाही ही भीती शेतकऱ्यांना लागली. आता पावसाने थोडी उसंत दिली मात्र खरी पण आता नदी काठच्या शेतकऱ्यांना नदी माय मुळे रडण्याची पाळी आली आहे
• सध्या राज्यात पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी धरणे 100 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि त्याचा फटका मात्र नदीकाठच्या सावळेश्वर तसेच इतर गावाच्या शेतकऱ्यांना बसत आहे.

उमरखेड तालुक्यातील इसापूर धरण या वर्षी फुल्ल भरल्याने पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने पैनगंगा नदी ची पातळी वारंवार वाढत असून नदीचे पाणी नदी काठ च्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसत असल्याने शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे पेंड पाण्यात वाहत आहेत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, आपले सोयाबीन वाचवन्यासाठी ट्रॅक्टर च्या साहाय्याने सुरक्षित जागी हलवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे या मुळे मात्र शेतकरी देशोधाडिला लागला आहे. शेतातील काही सोयाबीन चिखलात रुतले आहेत तर काही काढलेल्या सोयाबीनचा डोळ्या देखत चिखल होताना पाहून मात्र बळीराजाच्या डोळ्यात पाणी येत आहे. एवढं करूनही हाती आलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने येणारे सण, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. काही दिवसापूर्वी ढाणकीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने आंदोलन केले होते मात्र त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. एवढ्या आस्मानी आणि सुलतानी संकटाशी दोन हात करूनही पदरी निराशाच पडत असल्याने आता त्यांच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तरी यावर शासनाने आता योग्य ते पाऊल उचलने गरचेचे असून धरणातील पाणी विसर्गाचे योग्य ते नियोजन करण्याची मागणी होत असून जेणे करून हाती आलेला घास जाणार नाही.
0 Comments